यावल : तालुक्यातील सावखेडासीम येथील एका 41 वर्षीय इसमाने शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. युसूफ सुलेमान तडवी (41) असे मयताचे नाव असून हा प्रकार निदर्शनास येताच यावल पोलिसांना माहिती देऊन मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणण्यात आला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
व्यसनाला कंटाळून आत्महत्येचा संशय
सावखेडासीम ता.यावल येथील रहिवाशी युसूफ सुलेमान तडवी (41) हा व्यसनाधीन झाल्याची चर्चा होती व गुरूवारी सावखेडासीम शेत-शिवारातील प्रेमचंद शालिकराम पाटील यांच्या शेतात युसूफने निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार मजुरांच्या निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिसांना माहिती कळवण्यात आली. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
या प्रकरणी यावल पोलिसात मुराद तडवी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार संजय देवरे करीत आहे.