व्यसनाला कंटाळून शिक्षकाच्या मुलाने संपविले जीवन

0

दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या घटनांनी समाजमन सुन्न ;ताणतणावातून तरुणाने मृत्यूने कवटाळल्याची प्राथमिक माहिती

जळगाव – रामानंदनगर परिसरातील जागृती हौसिंग सोसायटी येथील सारंग राजेंद्र निकम या तरुणाने दुपारी 1 वाजेच्या सुमारास एकटे असल्याची संधी साधत छताच्या हुकाला दोराच्या सहाय्याने गळफास घेतला. सांरग हा व्यसनांच्या आहारी केला होता. याच व्यसनाला कंटाळून सारंगने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सारंग राजेंद निकम याच्या आईच लहानपणीच निधन झाले आहे. तो वडील राजेंद्र निकम, आजी सुमन तसेच लहान भाऊ हर्षल यांच्यासह रामानंदनगर परिसरातील जागृती हौसिंग सोसायटी येथे जिव्हाळा या अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर रहात होता. वडील राजेेंद्र तुकाराम निकम हे ममुराबाद येथे पंडीज जवाहरलाल नेहरु विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सारंग याचे बी.टे.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गेल्या वर्षीय तो सिध्दार्थ केमिकल या कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वीच तो घरीच असल्याची माहिती मिळाली आहे.

लहान भावाचे सामान बांधण्यासाठी आणलेल्या दोराने गळफास
सारंगचा लहान भाव भाऊ हर्षल याला नुकताच पुणे येथील महाविद्यालयात बी.ई. इंजिनिअरींगसाठी प्रवेश मिळाला. त्यासाठी हर्षल बुधवारी पुणे जाण्यासाठी येथे गेला. रात्री गादी तसेच इतर सामान घेवून जाता यावा म्हणून बांधण्यासाठी नवीन दोर आणला होता. रात्री सारंगने त्याच्या भावाला सोडले. यानंतर सकाळी वडील नेहमीप्रमाणे शाळेत निघून गेले. उठल्यानंतर सारंग हा टेलिफोनचे बिल भरुन आला. यावेळी त्याची आजी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर बसली होती. तो आल्यावर आजीही वरती आली. मात्र सारंगने तिला मला काहीही नको आहे तसेच तु माझ्या खोलीत येवून नको, असे म्हणून खोली बंद केली. दरवाजा उघडत नसल्याने आजीने हा प्रकार शेजारच्यांना सांगितला. शेजारच्यांसह अपार्टमेंटमधील तरुणांनी मागच्या बाजूने खिडकीच्या काचा फोडल्यावर सारंग गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर समोरील बाजून दरवाजा तोडण्यात आला. व रामानंदनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. रामानंदनगरचे अनिल फेगडे यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला तसेच मृतदेह रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात हलविला.

दारुचे व्यसन सोडविण्यासाठी सुरु होते उपचार
सारंगने आत्महत्या केल्याची माहिती कळविल्यावर शाळेत ममुराबाद येथे असलेले वडील राजेंद्र निकम यांना धक्का बसेल म्हणून त्याच्याकडून माहिती लपविण्यात आली होती. थेट शेजारचे त्यांना घेण्यासाठी ममुराबाद येथे गेले होते. ते थेट जिल्हा रुग्णालयात आले. सारंग दारुच्या आहारी गेला होता. दारु पिवुन घरी आल्यावर त्याला विचारणा करताच तो माझ्याशी तसेच आईसोबत शिवीगाळ करुन भांडण करायचा, त्याच्यावर मनोविकार तज्ञांकडेही उपचार सुरु होते, अशी माहिती राजेंद्र निकम यांनी पोलिसांना दिली.