व्याज सवलत योजनेची प्रतीक्षा

0

सोयगाव। खरिपाच्या पिकविम्याच्या मुदतवाढीनंतर शेतकर्‍यांची शुक्रवारी 4 पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची प्रतीक्षा करण्याची वेळ जिल्हा बँकेत आली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचा निम्मा हंगाम बँकेभोवती प्रतीक्षेतच जाण्याची वेळ तालुक्यातील शेतकर्‍यांवर आली आहे.

शासनाने नुकतीच खरिपाच्या पीकविम्याची मुदतवाढ केली होती.परंतु अध्यादेशात गुंतागुंत असल्याने मुदतवाढीच्या शेवटच्या दिवसापर्यंत 4 शेतकरी मात्र गोंधळातच राहिल्याने शेवटपर्यंत मुदतवाढीचा घोळ मिटेनासा झाल्याने अखेरीस शेतकरी शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी व्याज सवलत योजनेकडे वळले आहे. परंतु पिककर्जाचे व्याजही खात्यावर अद्याप जमा न झाल्याने शेतकर्‍यांना माघारी येण्याची वेळ आली आहे. शासनाने मार्च 2016 अखेरीस पर्यंत नियमित कर्जाचा भरणा केलेल्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना चालू केली आहे. या योजनेतील पात्र शेतकर्‍यांच्या याद्या संबंधित सेवासंस्थांनी जिल्हा बँकांना 31 जुलै 2017 अखेरीस जमा करून दिले. परंतु अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यावर परत केलेल्या पिककर्जाचा परतावा जमा न झाल्याने या व्याजाची प्रतीक्षा करावी लागली.