व्यापारी संकुलातील स्वच्छतागृहे झाली दुकाने

0

* स्वच्छतागृहे न झाल्यास आंदोलन करण्याचा शिवसेनेचा पवित्रा
* सेनेचे माजी तालुकाध्यक्ष यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नवापूर – नवापूर शहरात व्यापारी संकुले उभारताना संबंधितांनी सार्वजनिक सुविधा अंतर्गत स्वच्छतागृह पार्किंगसाठी पुरेशी जागा न देता स्वच्छतागृह व पार्कीगच्या जागेवर दूकाने बनवुन ग्राहकांना व व्यापारी यांना अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अनेक वर्षापासून पाठपुरावा करूनही पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी दबावाखाली लक्ष न दिल्याने नगरपालिकेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाले आहेत. यापूर्वी कार्यवाहीचे आस्वासन देऊनही त्यांची पूर्तता न झाल्याने 30 नोव्हेंबरला मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष त्यांनी दिला आहे याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले आहे.

निवेदना म्हटल्याप्रमाणे
प्रादेशिक नगररचना 1966 च्या अधिनियमाच्या तरतुदींनुसार व्यापारी संकुल उभारताना किमान पार्किंगची जागा आणि स्वच्छतागृहांची आवश्यकता असते मात्र नवापूर शहरात विविध ठिकाणी अशी संकुले उभारताना या बाबींकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले आहे बांधकाम व्यवसायिकांनी संकुले बांधून दुकानांची विक्री केली मात्र तेथे वरील प्रार्थमिक सुविधा नसल्याने अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत 20१२ पासून निदर्शनास आणून देऊनही पालिकेने तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाने लक्ष दिले असते तर या बेकायदेशीर बांधकामांना आळा घालणे शक्य होते. यासाठी मुख्याधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांपासून नगरविकास खात्यापर्यंत पत्रांद्वारे पाठपुरावा केला आहे. प्रत्येक वेळी कारवाई आश्वासन दिले आहे. मात्र प्रत्यक्षात कृती मात्र झालेली नाही. तहसीलदारांनी 17 एप्रिलला दिलेल्या उत्तरात बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देऊनही आजपर्यंत कारवाई झालेली नाही. कारवाईचे मुख्याधिकाऱ्यांना अधिकार असताना त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या मागणी
१. मागील पंधरा वर्षातील नियमबाह्य व्यापारी संकुलाच्या जागेत नियमाप्रमाणे पार्किंग सार्वजनिक सुविधा संडास बाथरूम व्यवस्था न केल्याने अतिरिक्त बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करून सुविधा कराव्यात.
२. बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
३. नियमबाह्य बांधकामाला संमती देणाऱ्या वास्तुविशारदांचा परवाना रद्द करावा.
४. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई व्हावी.
५. बांधकाम व्यावसायिकान विरोधात नवापुर नगर पालिकेने नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याबाबतचे लेखी व खोटी माहिती देणाऱ्या मुख्याधिकारी वर कायदेशीर कारवाई व्हावी.