अमळनेर । येथील नगरपरिषद अंतर्गत एकात्मिक विकास योजनानुसार व्यापारी संकुल परिसर सुशोभीकरण भूमिपूजन आज सकाळी 11 वाजता पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी जलसंपदा मंत्री ना.गिरिश महाजन, सहकार व पणन मंत्री ना. सुभाष देशमुख, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, मुख्याधिकारी उत्कर्ष कुटे, बांधकाम सभापती मनोज पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे उपस्थित होते.