जळगाव । मनपाच्या मालकीच्या असलेल्या एकुण 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत सन 2012 मध्ये संपुष्टात आली होती. दरम्यानच्या काळात सहा वर्षापासून थकीत गाळेधारकांच्या विरुद्ध अवाजवी भाडे, दंडात्मक रक्कम तसेच ई-लिलावाचा अन्यायकारक असा देशोधडीला लावण्याचा ठराव महानरपालिकेने केल्याने तात्काळ योग्य तो निर्णय न घेतल्यास यापुढे आंदोलन कमी न होता तिव्र करण्यात येईल, असा इशारा मनपा गाळेधारक मार्केट कोअर कमेटीतर्फे देवून गेल्या चार दिवसांपासून बेमुदत संप सुरू होता. महानगरपालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेप्रश्नी प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी गाळेधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा नेवून बेमुदत बंद पुकारला, बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत काही गाळेधारकांनी सामुहिक मुंडन केले होते तर गुरूवारी शहरातील प्रमुख मार्गावरून गाळेधारकांनी मानवी साखळी करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच विधीमंडळात मुख्यमंत्र्यांना गाळेधारकांचे शिष्टमंडळ जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्यासह भेटले असता. मुख्यमंत्री याप्रकरणी मनपा अधिनियमात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी लिंबूपाणी देवून व्यापार्यांनी सुरू केलेल्या 20 मार्चपासूनच्या आंदोलनाला चौथ्या दिवशी सांगता केली. यावेळी सर्व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.