व्यापार्‍यांना कर्जमाफी नाही

0

नवी दिल्ली । सरकार देशातील कोणत्याही मोठ्या उद्योगपतींची थकित कर्जे माफ करणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. देशातील सरकारी बँका भांडवलदारांची मोठ्या रक्कमेची थकित कर्जे माफ करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. अरूण जेटली यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे या वृत्ताचे खंडन केले.