शिक्रापूर । शिक्रापूरमधील चोर्यांना आवर बसावा यासाठी नागरिक व व्यापार्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. व्यापारी व ग्रामस्थांनी जागरूक राहावे, असे आवाहन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी केले आहे.
शिक्रापूर येथील पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वाहन, मोबाईल चोरी, घरफोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढथ आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. चोर्यांना आवर घालण्यासाठी शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. व्यापार्यांनी एकत्र येऊन दुकानांना सुरक्षारक्षक नेमावेत, दुकानांसमोर सीसीटीव्ही बसवावेत तसेच ग्रामपंचायततर्फे गावातील मुख्य चौकामध्ये सीसीटीव्ही बसवावेत असे आवाहन गलांडे यांणी यावेळी केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, माजी सरपंच रामभाऊ सासवडे तसेच व्यावसायिक सुरेश थोरात, उत्तम गायकवाड, दिलीप कोठावळे तसेच परिसरातील अनेक व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.