आर.डी.भावसार ; रावेर येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम
रावेर- नागरीकांनी कोणतीही वस्तु खरेदी करतांना पक्के बिले घ्यावे, कच्चे बिल घेतल्यास स्वत:सह देशाच्या नुकसानीला कारणीभूत ठरू नये, असे आवाहन राष्ट्रीय ग्राहका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नायब तहसीलदार आर.डी.भावसार यांनी केले. शहरात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयात महसूल प्रशासनातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी अॅड.एम.ए.खान, दिलीप कांबळे, अॅड.धनराज पाटील, डॉ.गुलाब पाटील, प्रशांत बोरकर, माजी नगराध्यक्ष हरीष गणवानी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, नगरपालिका उपाध्यक्ष संगीता वाणी, रावेर पंचायत समिती गटविकास अधिकारी हबीब तडवी, नगरसेविका शारदा चौधरी, बाळु शिरतुरे, अॅड.योगेश गजरे, जगदीश घेटे, पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील, पुरवठा अव्वल कारकून शेखर तडवी, जानव्ही मानकर, डी.डी.वाणी, अशोक महाजन, पुरवठा हिशोब अव्वल कारकून शैलेन्द्र तरसोदे, मनीष नाईक, देविदास महाजन, मोहन महाजन, विठ्ठल पाटील, काशिनाथ शिंदे, वैध मापन निरीक्षक ए.बी.तोटे उपस्थित होते. सूत्रसंचलन विजय पाटील यांनी केले.
वैध मापन, अन्न प्रशासनाचा सुस्त कारभार
दिवसा-ढवळ्या अनेक ग्राहकांची व्यापारी लूटमार करतात मात्र त्यांना खरे मार्गदर्शन व न्याय मिळवून देण्याची जबाबदारी अन्न प्रशासन विभाग व वैध मापन विभागाच्या अधिका-यांवर असते त्यांनीच कार्यक्रमाला दिरंगाई दाखवल्याने उपस्थितीत ग्राहकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाला खरी फसवणूक दुकानदारांपेक्षा अन्न प्रशासन, वैध मापन विभागाचे अधिकारी करीत असल्याने त्यांच्यावर आधी कारवाई करावी, अशी मागणी उपस्थित ग्राहकांमधून करण्यात आली.