धुळे। आज दुपारी शहरातील हस्ती बँकेसमोरुन चोरट्यांनी व्यापार्याची 76 हजारांची रोकड हातोहात लंपास केल्याची घटना घडली आहे. स्टेशन रोड भागातील पांडव प्लाझा येथे राहणार्या पंकज मनुभाई शाह या व्यापार्याने बँक ऑफ इंडियामधून सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास 76 हजार रुपये काढले.
हे पैसे त्यांना एचडीएफसी बँकेत भरायचे होते. (एम.एच.18 टी 7632) क्रमांकाच्या मोटारसायकल ते बँक ऑप इंडियामधून एचडीएफसी बँकेकडे जात असतांना हस्ती बँकेचे पासबूक भरण्यासाठी ग.नं.5 मधील बँकेच्या शाखेत गेले गाडी बाहेर उभी करुन पासबूक अपडेट विषयी माहिती त्यांनी विचारली बँकेच्या कर्मचार्यांनी दुपारी 4 नंतर या असे सांगितले. त्यामुळे शाह काही मिनिटात माघारी फिरले मात्र या वेळेत चोरट्यांनी शाहा यांच्या गाडीच्या डिक्कीतून 76 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरात अशा पद्धतीने होत असलेले हल्ल्यांमुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडे नागरीकांकडून प्रश्न उपस्थित होत आहे.