नवापूर:भारतीय जनता पाटीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नवापूर येथे जाऊन भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोरोना महामारीच्या अनुषंगाने भाजपा पदाधिकारी यांनी केलेल्या सेवा कार्याचे विजय चौधरी यांनी कौतुक केले. यावेळी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे बंद असलेले व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्याशी चर्चा करून दुकाने सुरू करण्यात सहकार्य केले. तसेच नवापूर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरणात भ्रष्टाचार करीत असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जि.प.सदस्य भरत गावित, जिल्हा सरचिटणीस राजू गावीत,नगरसेवक महेंद्र दुसाने,
निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे, शहराध्यक्ष प्रणव सोनार, जिल्हा चिटणीस एजाज शेख, दिनेश चौधरी, हेमंत जाधव, जितेंद्र अहिरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.