जळगाव : कानळदा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शतपावली करत असताना महेंद्रकुमार लक्ष्मीनारायण मंडोरे वय ६४ रा.नवी पेठ या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील दागिन्यांसह ८० हजार रुपयांची रोकड असा सव्वाचार लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. दरम्यान या घटनेत चोरटय़ांनी मंडोरे यांनी कुणालाही फोन लावू नये म्हणून त्यांचा मोबाईल दगडावर आपटून फोडून टाकल्याचा प्रकार यावेळी घडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
सविस्तर वृत्त लवकरच