पुणे :- तुळशीबागेतील व्यापा-यांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे व्यवसायात अडथळा निर्माण होत असून कोणाचाच व्यवसाय योग्य रितीने होत नाही आहे. तसेच रस्त्यावरची गर्दी, दुकानामध्ये येणा-या नागरिकांची गर्दी त्यामुळे लोकांना चालायला देखील त्रास होताना दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जागा आखून दिल्या, स्टॉलवाल्यांना उपाययोजना करून दिल्या तर नक्कीच सर्व व्यावसायिक एकत्रितपणे चांगला व्यवसाय करू शकतील, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. तसेच या भागात चो-यांचे प्रमाण वाढले असून यासाठी सीसीटिव्ही बसविणे गरजेचे असून सीसीटिव्ही चा उपयोग अतिक्रमण विभागाला देखील होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या भागात सीसीटिव्ही बसविण्यात येतील, असेही ते म्हणाले.
छोटे व्यावसायिक असोसिएशन पुणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने जागतिक व्यापार दिनानिमित्त तुळशीबागेतील ज्येष्ठ व्यापारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन तुळशीबाग येथे करण्यात आले होते. यावेळी शिल्पकार विवेक खटावकर,नगरसेवक राजेश येनपूरे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.