व्यायामशाळा बंद होण्याच्या मार्गावर

0

शहादा । एका बाजुला शासन क्रिडासाठी व्यायम शाळासाठी कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे.यासाठी शासनाचा बजेट मध्ये तरतुद केलेली आहे. काही ठिकाणी याचा उपयोग शुन्य आहे याला प्रशासकीय अधिकार्‍याची व लोकप्रतिनिधीची उदासिनता याला जबाबदार आहे.शहादा शहरात व्यायामशाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 97 वर्षाचा जुना इतिहास असलेल्या हिंदु हनुमान व्यायाम शाळेची दुर्दशा झाली आहे.शहरातील हिंदु हनुमान व्यायाम शाळेची 1920 ला स्थापना झाली होती. सुरुवातीच्या काळात व्यायाम शाळेसाठी शेकडो तरुण येत असत. अक्षरश: नंबर लागत होते. साहित्य भरपुर होते.यशवंत चित्र मंदिराजवळ व्यायाम शाळेची इमारत आहे. या व्यायाम शाळेतुन चांगले मल्ल तयार होत होते..

हिंदु व्यायामशाळेचा लौकीक : खान्देशातील हिंदु व्यायाम शाळेचा लौकीक होता. अनेक मल्लानी विविध स्तरावर कुस्त्या गाजविल्या आहेत. या व्यायामशाळेच्या उभारणीसाठी व प्रगतीसाठी गजानन पाठक, ताराचंद अग्रवाल, कै.न्हानु माळी,कै.ड.प्रकाश सावळे,विजय बंसी पाटील सह त्यांच्या सहकार्‍यानी योगदान दिले आहे.आज व्यायाम शाळेचा कारभार प्रख्यात वकील ड.प्रसन्न सावळे यांचाकडे असून ते अध्यक्ष आहेत. या ह्नुमान शाळेची पुन्हा उभारणी कशी करता येइल त्याचे वैभव परत कसे मिळविता येइल म्हणून प्रसन्न सावळे प्रयत्नशील आहेत. त्याना लोकप्रतीनिधी व सामाजीक कार्यकर्त्याचे सहकार्य मिळणे अपेक्षीत आहे.व्यायाम शाळेची दुर्दशा झाली आहे. स्लॅपला तडे जात असुन प्लॅस्टर निघत आहे. व्यायामासाठी लागणारे अद्यावत साहित्य अपुर्ण आहे.

लोकप्रतिनिधींकडे तक्रारी
आज ही असंख्य तरुण अश्या परिस्थितीत व्यायाम करायला येतात हे विशेष आहे.अनेक वेळा तरुणानी लोकप्रतिनिधी जवळ तक्रारी केल्या पण कोणीही दखल घेतली नाही.पुर्ण इमारत नवीन बांधणे आवश्यक आहे.सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी स्वत: व्यायामशाळेची पहाणी करुन क्रिडा विभागाकडुन अनुदान मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. आ.उदेसिंग पाडवी यानी आपल्या आमदार निधीतुन व्यायाम शाळेसाठी व खा. हिना गावीत यानी खासदार निधीतुन व्यायाम शाळेसाठी निधी मंजुर करावा अशी मागणी आहे.

गेल्या अनेक वर्षापासुन बंद
शहरात दुसरी महाराष्ट्र व्यायाम शाळा होती. जुना प्रकाशा रस्त्यावर लोकमान्य टिळक टाऊन हॉलला लागुन आहे ती गेल्या अनेक वर्षापासुन बंद आहे. त्या व्यायाम शाळाची स्थापना माजी नगराध्यक्ष अशोक बागुल यानी केली होती. या व्यायाम शाळेतुन देखील अनेक मल्ल तयार झाले होते. असंख्य तरुण व्यायाम शाळेत येत या व्यायाम शाळेचे पुन्नरज्जीवन करण्यात आले तर अनेक तरुणाना त्याचा लाभ होणार आहे.शहादा शहराची 65 हजार पर्यन्त लोकसंख्या बघता कमीत कमी युवकासाठी क्रिडाप्रेमीसाठी पाच व्यायाम शाळा असणे गरजेचे आहे.ज्या दोन व्यायाम शाळा होत्या त्यापैकी एक महाराष्ट्र व्यायाम शाळा बंद आहे. एक मात्र हिंदु व्यायाम शाळा आहे त्या परिस्थितीत सुरु आहे. सत्ताधारी कार्यकर्त्यानी पाठपुरावा करावा अशी मागणी आहे.

शहरातील शेकडो तरुण व्यायाम शाळेत व्यायमासाठी येण्यास उत्सुक आहेत. त्या परिस्थीतीत आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो पण ज्या व्यायाम शाळेला 97 वर्षाचा इतिहास आहे त्याची नवीन बांधणी आवश्यकच आहे मि गेली चाळीस वर्ष या व्यायम शाळेत घालवली आहेत.
– सुनिल भारती