पुणे । आजच्या धकाधकीच्या जीवनात कमी वयातील लोकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण बळावत आहे. आता मध्यम वयातील लोकांना ह्रदयरोग होत आहे. व्यायामाचा अभाव, जंक फूड, सिगारेट, तंबाखू यांमुळे हा आजार होत आहे. त्यामुळे याबाबत जनजागृतीची आवश्यकता आहे, असे मत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील साठे यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय जय गणेश रुग्ण सेवा अभियानात हर्डीकर हॉस्पिटलच्यावतीने मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, डॉ.बाळासाहेब परांजपे, महेश सूर्यवंशी, सुनिल रासने, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशिष त्रिवेदी, डॉ. विवेक जगताप, अशोक घोणे यांसह दगडूशेठ ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.