नवी मुंबई :- शिवसेनेच्या नगरसेविका कोमल वास्कर यांच्या प्रभागात येत असलेल्या सानपाडा सेक्टर 5 मधील गावदेवी मैदानामध्ये अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी 50 लाख रूपये निधी दिला आहे.
सदर मैदानामध्ये 84 चौरस मीटर भूखंडावर व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे आणि त्याविषयीचा प्रस्ताव तयार केला. पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव मागच्या आठवड्यात संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. मात्र या प्रस्तवावर बोलताना राष्ट्रवादी काँगे्रसच्या सदस्यांनी नकारात्मक भूमिका मांडली होती आणि सदरचा प्रस्ताव स्थगित ठेवण्याची मागणी केली होती .त्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला होता .मात्र शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत पुन्हा हा प्रस्ताव पटलावर मंजुरीसाठी ठेवला असता सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.