पुणे । मराठी आंत्रप्रेनर्स नेटवर्कतर्फे 18 ते 20 ऑगस्ट या कालावधीत व्यावसाय प्रदर्शन आयोजित केले आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे होणार्या या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे 70 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
शुक्रवारी (दि. 18) सकाळी 11 वाजता ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती नेटवर्कचे सुरेंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिरीश देशपांडे, अनंत जोशी आदी यावेळी उपस्थित होते. मराठी व्यावसायिकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहचविता यावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.