यावल । महर्षि व्यासांच्या सानिध्याने पावन झालेल्या ऐतिहासीक व्यास नगरीतील पुरातन किल्ल्याला तटबंदी नसल्याने पावसाळ्यात पडझड होवून हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा यावलकरांमधून व्यक्त होत आहे. किल्ल्याची एक बाजू वैभवात उभी असलीतरी तीनही बाजू मात्र भुईसपाट झाल्या आहेत.
पुराच्या पाण्याने पुरातन वास्तूला हानी
किल्याखाली नगरपरीषद कार्यालय असून वरील बाजुस न्यायालयाची इमारत आहे. हडकाई-खडकाई या दोन नद्यांच्या संगमावर असलेली वास्तू पुराच्या पाण्यामुळे ढासळत असून दरडी कोसळत असल्याने अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे.