व्यासपीठावरच नितीन गडकरी यांना आली भोवळ; रुग्णालयात दाखल

0

अहमदनगर-केंद्रीय मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. या ठिकाणी एका कार्यक्रमात व्यासपीठावर असतांनाच त्यांना अचानक भोवळ आली आणि त्यात ते बेशुद्ध झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान आता खुद्द नितीन गडकरी यांनी प्रकृतीस्थिर असून काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे ट्वीटरवरून सांगितले. शुगरचे प्रमाण कमी झाल्यामुळे थोडीशी प्रकृती बिघडली असे गडकरी यांनी सांगितले आहे.

राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभासाठी ते उपस्थित होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रगीत सुरु होते. याच दरम्यान गडकरी यांना भोवळ आली. त्यावेळी राज्यपाल यांनी त्यांना सांभाळले.