Harassment of Yaval’s wife for not taking her for second marriage: Crime against five persons including husband यावल : शहरातील व्यास नगरातील माहेर असलेल्या 22 वर्षीय विवाहितेचा माहेरून कार घेण्यासाठी 50 रुपये हजार रुपये आणावेत व दुसरे लग्न करायचे असल्याने फारकत घ्यावी म्हणून छळ करण्यात आली तसेच मारहाण करून दुखापत करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात पतीसह पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
छळ करीत केली मारहाण
यावल शहरातील व्यास नगरातील माहेर असलेल्या गायत्री रोहित भिडे (22) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह 1 मे 2018 रोजी रोहित संजय भिडे (रा. निंबा चौक, गुरु स्टॉप दोंडाईचा, ता.शिंदखेडा) यांच्याशी झाला. लग्नानंतर पतीने तिच्याकडे माहेरहून कार घेण्यासाठी 50 रुपये हजार रुपये आणावेत तसेच तू मला आता आवडत नाही मी दुसर्या मुलीवर प्रेम करतो, तु मला मुलगा देऊ शकत नाही, मला दुसरे लग्न करायचे आहे म्हणून फारकत दे, असे सांगून तिचा मानसिक आणि शारीरीक छळ केला व तिला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तिच्या पतीने तिला मारहाण करीत धातूचे कड्याने दुखापत केली.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी यावल पोलिसात पती रोहित संजय भिडे, सासू रेखा संजय भिडे, सूर्याबाई प्रकाश टोपे (रा.निंबा चौक गुरु स्टॉप, 9 नंबर शाळेजवळ दोंडाईचा) तसेच वंदना शक्ती सारसर आणि अंजली प्रवीण सारसर (रा. शनिपेठ, जळगाव) या पाच जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.