व्वा.. रे, गाढवाची महिन्याची कमाई 2 लाख रूपये

0

चंदिगड । प्रजोत्पादन ही गोष्ट सृष्टीतील कोणत्याच प्राण्याला नवी नाही. माणसाने प्रजोत्पादन करून पैसा कमवण्यास तशी कायद्याने परवानगी नाही. मात्र, हा कायदा प्राण्यांना लागू नाही. त्यामुळेच एक गाढव आपल्या मालकाला महिन्याकाठी तब्बल दोन लाख रूपये कमावून देते. मुका बिचारा जीव कष्ट करतो. त्याचा मालक मात्र गाढवाच्या नैसर्गीक क्रियेचा व्यवसाय करतो आणि गलेलठ्ठ कमाई करतो. हा प्रकार आहे हरियाणामधील झज्जर इथला. इथल्या बेरी या ठिकाणी प्राण्यांचा मेळा भरला आहे. हरियाणाच्या आणि देशाच्या कानाकोपर्‍यातून अनेक मालक आपापल्या प्रण्यांना घेऊन आले आहेत. मात्र, संपूर्ण मेळ्यात बोलबाला आहे तो, एका गाढवाचा. होय, गाढवाचा. या गाढवाने आर्थिक कमाईच्या बाबतीत मेळ्यातील सर्व प्राण्यांना मागे टाकले आहे. महिन्याकाठी हे गाढव मालकाला मिळवून देणारी कमाई पाहून अनेकांचे डोळे विस्फारत आहेत.

मेळ्यातील हे गाढव पाहण्यासाठी लोकांची झूंबड उडाली आहे. तर, अनेकांनी हे गाढव खरेदी करण्यासाठी विक्रमी बोली लावली आहे. या गाढवाचा मालक मात्र गाढवाची विक्री न करण्यावर ठाम आहे. त्यामुळे विक्रमी बोलू लागूनही गाढवाची विक्री होत नाही. राजू कुमार असे या गाढवाच्या मालकाचे नाव आहे. राजू कुमार यांनी आपल्या लाडक्या गाढवाचे नाव सोनू असे ठेवले आहे. राजू यांचे गाढवावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळेच चक्क पाच लाख रूपयांची बोली लागूनही राजू यांनी सोनूच्या विक्रीचा प्रस्ताव फेठाळून लावाला. रंगाने अत्यंत गडद असलेला सोनू हा एक स्मार्ट गाढव म्हणून ओळखला जातो. सोनू गाढवाची उंची आणि इतर बाबी इतर गाढवांहून अगदीच भिन्न आहेत. सोनूची उंची 55 इंच इतकी आहे. सामान्य गाढवांची उंची 20 ते 30 इंच इतकी असते तसेच, इतर गाढवांपेक्षा अंगापींडानेही तो चांगलाच धडधाकट आहे. आपल्या गाढवाला विकायचं नसतानाही त्याला घेऊन मेळाव्यात का आला असं विचारला असता राजू कुमारने सांगितलं की, ‘मला माझ्या या लाडक्या गाढवाचे प्रदर्शन करण्यासाठी ही जागा योग्य वाटली’.

राजू सोनीपत जिल्ह्यातील बंस गावात राहतो. राजू लोकांना भेटल्यावर आपले व्हिजिटिंग कार्ड देतो. राजूने सांगितले की, ‘सोनू आमच्या घरी जन्माला आला असून मला तो मुलासारखा आहे. त्याची देखभाल, जेवण आणि इतर गोष्टींसाठी महिन्याला कमीत कमी 17 हजार खर्च करतो’. सोनूच्या जीवावरच मालक राजू कुमार यांचे कुटूंब चालते. सोनू गाढवाच्या या हटके गुणधर्माचा फायदा घेत मालक राजू कुमार यांनी त्याला व्यवसायाची जोड दिली. मादी गाढव माजाला आले की, त्या गाढवाचे मालक त्या गाढवाला सोनूकडे घेऊन येतात. सोनू गाढवाकडे चांगल्या जातीचे प्रजोत्पादक गाढव म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा असते. अलिकडील काळात तर, माजावरील मादी गाढवासोबत सोन गाढवाचा एकवेळ समागम करण्यासाठी राजु कूमार हे तब्बल सात ते आठ हजार रूपये (7000 ते 8000 रूपये) आकारतात. चांगल्या गाढवाचे बिज मिळत असल्यामुळे मादी गाढवाचे मालकही ही रक्कम मोजण्यासाठी मोठ्या हौसेने तयार असतात.