वॉशिंग्टन । आतापर्यंत मंत्रालयासमोर आत्महत्यांच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. परंतु, आता चक्क अमेरिकेच्या व्हाइट हाऊससमोर एका व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी व्हाइट हाऊसच्या उत्तरेस ही घटना घडली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प हे फ्लोरिडा येथे होते.
यावेळी सुमारे 100 हून अधिक लोक घटनास्थळी उपस्थित होते. त्याचवेळी त्या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पण त्याच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. हा व्यक्ती व्हाइट हाऊसच्या उत्तरेकडील सुरक्षा व्यवस्था तैनात असलेल्या परिसरात गेला. त्याने लपवून ठेवलेली आपली रिव्हॉल्वर काढली आणि स्वत:वरच अनेक गोळ्या झाडल्या. या घटनेत इतर कोणीही जखमी झालेले नाही.