व्हिडिओ क्लीप व्हायरल: त्या कर्मचार्‍यावर कारवाई होणार

0

भुसावळ– नाहाटा चौफुलीवर वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून पावती न देता पैसे मागणार्‍या तीन कर्मचार्‍यांची व्हिडिओ क्लीन काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्याने बाजारपेठ पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे उडाले होते तर पोलिसांवर सोशल मिडीयातून टिकेची झोड उठली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पत यांनी ही बाब गांभीर्याने घेत उभयंतांना फैलावर घेतले होते व या कर्मचार्‍यांनी रीक्षा चालकाला दंडात्मक पावती दिल्याची माहिती देत संबंधितालादेखील हजर केले होते मात्र रामचंद्र मोरे नामक कर्मचारी पावती न देता पैसे घेत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यास कर्मचार्‍यास नियंत्रण कक्षात जमा करण्याबाबत ऑर्डर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी काढली असून अन्य दोघांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.