मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘झिरो’हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीझ झाला पण प्रेक्षकांना इतका भावला नाही. प्रेक्षक निराश झाले. मात्र हा चित्रपट बनविण्यासाठीची मेहनत प्रचंड होती.
शाहरुखने चित्रपटात बऊआची भूमिका साकारली आहे. यात शाहरुख एका बुटक्या व्यक्तीच्या पात्रात दिसला. ही भूमिका सार्थकी ठरविण्यासाठी टीमने घेतलेल्या मेहनतीबद्दल उल्लेख केलेला व्हिडिओ शेअर केला आहे.