व्हिडिओ व फोटो व्हायरलची धमकी देत चोपडा तालुक्यातील 25 वर्षीय विवाहितेवर अत्याचार

चोपडा : तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय विवाहितेवर व्हिडिओ व फोटो व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी शुभम अशोक पाटील व प्रफुल्ल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहिता घरात एकटी असताना अत्याचार
25 मार्च 2022 रोजी शुभम अशोक पाटील (रा.चोपडा तालुका) याने 25 वर्षीय महिला ही घरात एकटी असतांना तीचे घरात स्वयंपाक रुममध्ये अनधिकृतपणे प्रवेश करुन महिलेचे तोंड दाबुन व्हिडिओ कॉल करुन काढलेले व्हिडिओ व फोटो व्हॉटसअ‍ॅपवर टाकून बदनामी करण्याची धमकी देवून जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासू, सासर्‍यांना मारहाण
रविवार, 27 मार्च 2022 रोजी सकाळी नऊ वाजता शुभम अशोक पाटील व प्रफुल्ल दिलीप पाटील यांनी महिला घरात एकटी असतांना तीचे घरात स्वयंपाक रुममध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले तसेच महिलेने आरडा ओरड केल्याने पळुन गेले. या घटनेबाबत महिलेने पती, सासू, सासरे यांनी सांगितले असता सदर घटनेचा जाब विचारण्यासाठी सासु, सासरे गेले होते. यावेळी शुभम पाटील व प्रफुल्ल पाटील यांनी लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शुभम अशोक पाटील, प्रफुल्ल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करीत आहेत.