[व्हिडियो]…मोबाइलमध्ये गुंग असणाऱ्या शिक्षकाचे निलंबन !

0

जळगाव: चोपडा तालुक्यातील सुटकार येथील उपशिक्षक साहेबराव गुलाबराव पाटील हे शाळेच्या वेळेत अध्यापनाचे काम न करता बेशिस्तपणे टेबलावर पाय ठेवून मोबाइलमध्ये गुंग असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. यावरून ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. संबंधित व्हिडियो तपासून सीईओ यांनी संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर गटविकास अधिकारी चोपडा यांनी संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे.

शाळेच्या वेळेत अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे अध्यापन न करता मोबाइलमध्ये व्यस्त असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. तसाच प्रकार सुटकार जिल्हा परिषदेच्या शाळेत दिसून आला. येथील शिक्षक साहेबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सोडले असून स्वत: समोरील टेबलावर बेशिस्तपणे पाय ठेवून मोबाइलमध्ये दिसून येत आहे. यावरून ग्रामस्थांनी तक्रार केली होती.