व्हिडीओ कॉल करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

A minor girl was molested by video calling जळगाव : व्हिडीओ कॉल करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव शहर पोलिसांनी संशयीत सादखान अय्युबखान (19, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यास बेड्या ठोकल्या आहेत.

पाठलाग करीत केला विनयभंग
सादखान अय्युबखान हा 25 नोव्हेंबर पासून तर आजपर्यंत 15 वर्षीय पिडीत मुलगी शाळेत जातांना तिचा सतत पाठलाग करुन अश्लिल इशारे करत होता. तसेच पीडीत मुलीच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल करुन अश्लिल कृत्य करण्यास दबाव टाकुन लज्जा वाटेलअ अशा रीतीने तिच्याशी वागला. तसेच सादखान याने पीडीतेच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत फोनद्वारे, प्रत्यक्ष पाठलाग करीत त्रास दिल्याने पीडीतेने संशयीत सादखान अय्युबखान याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला अटक करण्यात आली. पुढील तपास सहा.निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.