[व्हिडीओ] पाचोरा शहराशी संपर्क तुटला

0

दोन्ही पुलांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प

पाचोरा – गेल्या दोन दिवसांपासून होणार्‍या मुसळधार पावसामुळे पाचोरा शहरात प्रवेश करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या दोन्ही पुलांवर पाणी साचल्याने वाहतुक पुर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे पाचोरा शहराशी संपर्क तुटल्याचीच परिस्थीती निर्माण झाली आहे. दरम्यान प्रशासनाने नागरीकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

पाचोरा- जळगाव मुख्य रस्त्यावर असणारा पूल रस्त्याच्या बांधकामामुळे पाडण्यात आलेला आहे. त्याला पर्यायी दुतर्फा जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी निर्माण केलेले दोन्ही पूल वाहून गेले आहेत. तसेच कृष्णापुरी भागांमध्ये असणार्‍या पुलावरही मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहतुकीसाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे पाचोरा शहराकडे जाणारी व येणारी वाहने ही थांबून आहेत. या शहराशी संपर्क तुटल्याची परिस्थीती निर्माण झाल्याने नागरीकांमधुन प्रशासनाविरूध्द तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळी परिस्थीती लक्षात घेता प्रशासनाने आधीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान प्रशासनाकडुन या पुरपरिस्थीतीची पाहणी करण्यात आली असुन नागरिकांनी वाहतुक करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

एस.टी.बससह खाजगी प्रवासी सेवा बंद

पावसाच्या पाण्यामुळे पाचोरा शहराला जोडणारे दोन्ही पूल वाहुन गेल्याने एस.टी. बससह खाजगी प्रवासी वाहतुक सेवेवरीही परिणाम झाला आहे. प्रवासी वाहतुक पुर्णत: बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी अडकुन पडले आहे. पाचोरा शहरातून हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे ही वाहतूक ठप्प झालेली आहे.