व्हिडीओ पार्लरची प्रतिस्पर्ध्याकडून तोडफोड

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिस्पर्ध्याचा व्हिडीओ पार्लरचा व्यवसाय जोमात चालत असल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने काळेवाडी येथील एका व्हिडीओ पार्लरची तोडफोड केली आहे. ही घटना सायंकाळी चार वाजता घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अजित दत्तात्रय मासाळ (वय 23), बालाजी हरिदास कांबळे (वय35), बळीराम उर्फ भैय्या श्रीधर मसाळ (वय 22, सर्व रा. रुपीनगर, निगडी) यांना अटक केली आहे. त्यांचे इतर साथीदार फरार आहेत.

रुपीनगरातील तिघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पोळ (वय 38 रा. हडपसर) यांचे काळेवाडीतील आठवण चौकात हनुमान व्हिडीओ पार्लर आहे. त्यांचा पार्लरचा व्यवसाय जोमात चालत असल्याचा राग मनात धरून आरोपींनी सात ते आठ साथीदारांच्या मदतीने लाकडी दांडके, तलवारी घेऊन सेंटरमधील दहा व्हिडीओ गेम, एलसीडी, डिस्प्ले मशीन व काऊंटरची तोडफोड केली व दुकानातील कामगारास शिवीगाळ करुन धमकी दिली. वाकड पोलिसांनी तिन्ही आरोपीना अटक करून तपास सुरू केला आहे.