[व्हिडीओ] रावेरच्या जागेसाठी शहर काँग्रेसचे उपोषण

0

जळगाव– रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा या मागणीसाठी काँग्रेसच्या शहरातील पदाधिकार्‍यांनी आज काँग्रेस भवनाच्या प्रांगणात उपोषण केले. दरम्यान या मतदारसंघातुन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जागा वाटपावेळी रावेरची जागा काँग्रेसला मिळावी अन्यथा जळगावात राष्ट्रवादीचे काम करणार नाही असा इशारा जिल्ह्याच्या प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांनी दिला होता. मात्र काही दिवसातच त्यांनी विरोधाची तलवार म्यान केली होती. दरम्यान आज शहरातील काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी रावेरच्या जागेसाठी काँग्रेस भवनाच्या प्रांगणात उपोषण पुकारले. यावेळी रावेरची जागा काँग्रेसला मिळालीच पाहीजे, डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी मिळालीच पाहीजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जोपर्यंत जागा सुटणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेऊन आणि जागा न सुटल्यास राष्ट्रवादीच्या विरोधात काम करू असा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला आहे. यावेळी आंदोलनात माजी युवक अध्यक्ष परवेज पठाण, जाकीर बागवान, दीपक बाविस्कर, युबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर खान, अरूणा पाटील, अबजल पठाण, तवरेज शेख, उमेश पाटील, अनिल भावसार, अनिल वाणी, शिरीष कुळकर्णी, कैलास पाटील, मधुकर पाटील, संजीवनी खामकर, हिराबाई नन्नवरे, अल्ताफ शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.