लंडन – स्पेनची अव्वल टेनिसपटू गर्बाइन मुगुरुझाने अमेरिकेच्या अनुभवी व्हिनस विलियम्सवर दणदणीत मात करत विम्बल्डनच्या महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. तिचे हे कारकिर्दीतील पहिलेचे विम्बल्डनचे जेतेपद आहे. संपूर्ण खेळावर वर्चस्व राखताना तिने व्हीनसचा 7-5, 6-0 असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. अवघ्या एक तास 17 मिनिटात मुगुरुझाने विजेतेपदावर नाव कोरले.
पहिल्या सेटमध्ये व्हिनसने थोडाफार प्रतिकार केला पण दुस-या सेटमध्ये मुगुरुझाने आपल्या खेळाने व्हिन्सला पूर्ण निष्प्रभ करुन टाकले. पाचवेळा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरणारी व्हिनस नऊ वर्षात पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली होती. दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या मुगुरुझाला याआधी २०१५ साली बलाढ्य सेरेना विलियम्सविरुद्ध पराभव झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. शनिवारी झालेल्या सामन्यात मुगुरुझाने व्हीनसवर शानदार मात करत विम्बल्डनचे पहिले तर, ग्रँण्डस्लॅमचे दुसरे विजेतेपद आह