आळंदी : सन 2019 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग महसूल प्रशासनाने फुंकले आहे. या अंतर्गत मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या मशीनचे प्रात्याक्षिक करण्यात आले. नागरिकांतून जागृतीस शिरूर लोकसभा मतदार संघातील खेड, आळंदी विधानसभा मतदार संघातील आळंदीत माउली मंदिर परिसर तसेच श्री ज्ञानेश्वर विद्यालयात ही प्रात्यक्षिके पार पडली.
हे देखील वाचा
या प्रसंगी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आळंदी मंडलाधिकारी चेतन चासकर यांचेसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच शिक्षक उपस्थित होते. आळंदीत दोन ठिकाणी मतदारांमध्ये जागृती करण्यात आल्याचे मंडलाधिकारी चेतन चासकर यांनी सांगितले. व्हीव्हीपॅट जोडल्याने मतदान कोणाला केले ते समजणार असल्याने लोकशाही मजबूत होण्यास मदत होणार आहे. जागृती मोहीम राबविण्यास निवडणूक आयोगाने धोरण निश्चित केले आहे. त्याप्रमाणे मतदार संघांतून प्रभावीपणे जागृती केली जात असल्याचे खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सांगितले. आळंदीत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. माऊली मंदिर भागासह श्री ज्ञानेश्वर विद्यालयात प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. यावेळी पदाधिकारी, नागरिक, शिक्षक, नगरपरिषद आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते. व्होटर व्हेरि फिएबल पेपर ऑडिट ट्रेल अंतर्गत व्हीव्हीपॅट मशीनमुळे मत कोणास दिले हे काही सेकंद पाहता येणार आहे