नंदुरबार । जातीचे वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे या सह अन्य मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीने नंदुरबार येथील जातपडताळणी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला एका 80 वर्षीय आजी देखील उपोषणाला बसल्या आहेत. 19 डिसेंबर रोजी उपोषणाचा दुसरा दिवस होता.
अनेक प्रकरणे कार्यालयातच पडून
आदिवासी कोळी समाजाचे अनेक जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठीचे अनेक प्रकरण या कार्यालयात प्रलंबित आहेत, परंतु विविध कारण दाखवून ते प्रकरणे निकाली काढले जात नाही,त्यामुळे आदिवासी कोळी समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे,राजकिय दाबावातून ही प्रकरणे निकाली काढली जात नाही,असा आरोप संघटनेचा आहे,या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ठिक ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार येथील जातपडताळणी कार्यालय समोर 18 डिसेंम्बर पासून आदिवासी कोळी समाजाच्या लोकांनी आमरण बेमुदत उपोषण सुरू केले आहे, त्यात 11 जण उपोषणाला बसले असून एक 80 वर्षाची आजीबाई देखील उपोषणाला बसल्या आहेत,या आजीच्या मुलाचे व नातवाचे प्रकरण देखील धूळखात पडले आहे, त्यामुळे ‘जातवैधता प्रमाण पत्र घेतल्याशिवाय मी उठणार नाही’, असा निश्चय त्यांनी केला आहे.