जळगाव (सपना पवार) । प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं’ मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतील ओळी प्रेमाचा अर्थ उलगडणाव्या आहे. 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस ‘व्हेलेेनटाईन डे’ म्हणून साजरा करतात, यासाठी बाजारपेढेत अनेक विविध प्रकाराचे ग्रिटींग कार्डस् व भेटवस्तू उपलब्ध झालेले आहेत. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी अनेक भेटवस्तू देऊन महाविद्यालयीन तरूण तरूणींसमोर पे्रम व्यक्त करत असतात ज्यात जास्त प्रमाणात ग्रिटींग आणी चॉकलेटची मागणी वाढली आहे. 80 रूपयांपासून 900 पर्यंतचे ग्रिटींगकार्ड दुकानावर विक्रीस उपलब्ध आहे.
स्पेशल डे स्पेशल गिफ्ट
फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना यात विविध प्रकारचे डे असतात ज्यात तरूण तरूणी हे दिवसा प्रमाणे भेटवस्तू देत असतात. या दिवसात तरूण तरूणी एकमेकांना कपल मग, किचन, लव्ह फोटो फ्रेम असे आकर्षक भेटवस्तू देवून पे्रम व्यक्त करत असतात. जे मार्केटला 100 पासून 5000 रूपयांत विविध आकर्षक भेटवस्तू उपलब्ध झाले आहेत. यात काही तरूण तरूणींनी ते ‘व्हॅलेंटाईन डे’ मनवत नसल्याची प्रतिक्रीया दिली.
फेब्रुवारी हा संपूर्ण महिना आनंदाचा आहे. या महिन्यात मित्र मैत्रीण, फ्रेन्डस हे विविध प्रकारचे डे साजरा करत असतात. एकदुसर्यांना चोकलेट, फ्लॉवर, टेडी, भेटवस्तू देऊन डे साजरा करत असतात. तसेच हा महिना खूप खर्चाचा असून वेगळेच आनंदाचे सण यात असतात. संपुर्ण वर्षाचा आनंद या महिन्यात असतो. गर्लफ्रेन्ड-बॉयफे्रन्ड नसून सगळे मित्र मैत्रीणी आनंदाचा क्षण मनवतात.
– रूपाली, नुतन मराठा
व्हॅलेंनटाईन हा सर्वात आगळा वेगळा दिवस आहे. यात आनंद आणि दुःख हे दोन क्षण असतात. आनंदी म्हणजे कॉलेजात कट्टागॅग तर दुःखी म्हणजे फक्त शिक्षण, हे दिवस खूप मजेत महाविद्यालयीण वर्ष निघत आहे. मात्र फेब्रुवारी महिना वेगळयाच पद्धतीचा आनंद देवून जातो.
– उज्वला, नूतन मराठा
‘व्हॅलेंनटाईन डे’ म्हणजे खूप खर्च करणारा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही 7 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत विविध प्रकारचे ‘डे’ असतात. ज्यात 14 दिवस हा स्पेशल असून पुर्ण इंन्जोय करतात. प्रत्येक ‘डे’ साठी वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन केले आहे.
– कुणाल पटेल, नूतन मराठा