व्हेंटीलेटरचा अभाव : 24 तासात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू

भुसावळ : व्हेंटीलेटर न मिळाल्याने गेल्या 24 तासात तीन कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील ग्रामीण रुग्णालयातील डेडीकेटेड कोविड सेंटरमध्ये घडली. बुधवारी बोदवड तालुक्यातील एकाचा तर गुरूवारी यावल तालुक्यातील एक आणि भुसावळ शहरातील एक असे दोन असे तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

रुग्ण संख्या झाली फुल्ल
रुग्णालयात व्हॅन्टेलेटर असतांनाही ते धूळखात पडून आहे तर रुग्णालयात 40 बेडची क्षमता असून शहर व परीसरात रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्ण संख्या फुल्ल झाली तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सुध्दा रुग्णांवर उपचार केले जात आहे. डॉ. आंबेडकर वस्तीगृहात 120 बेडची क्षमता आहे. तेथेही 74 रुग्णांवर उपचार सुरू आहे. गुरूवारी पहाटेच यावल तालुक्यातील न्हावीच्या 60 वर्षीय महिलेसह कासोदा येथील 58 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. मयताच्या केसपेपरवर शहरातील शांती नगरातील रहिवासी असल्याचा पत्ता असल्याचे सांगण्यात आले तर बुधवारीदखील बोदवड तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला.