व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया

0

जळगाव । डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटीलेटरवर असलेल्या 55 वर्षीय रुग्णावर एन्जीओप्लास्टीची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाली. बर्‍हाणपुर येथील श्रीराम महाजन (वय 55) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यात त्यांच्या हृदयाची गती मंदावली होती. प्रतिमिनीट अवघे 25 ठोके पडत होते. रक्तदाबही नियंत्रीत नव्हता. किडनीतील मुत्रनलिकाही बंद होती. हद्याला रक्तपुरवठा करणार्‍या धमनीत शंभर टक्के ब्लॉक आढळून आले होते. त्यामुळे त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाची गती मंदावल्यामुळे त्यांना कृत्रीम श्वासोच्छवास (व्हेंटीलेटर) लावण्यात आला होता. महाजन यांच्यावर डॉ. रमेश मालकर यांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असुन रूग्णाची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे हृदयरोग तज्ञ डॉ. मालकर यांनी सांगितले. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असतांना देखील त्यांना जीवदान मिळाले.