धुळे । शहरातील एका व्हॉटस्अॅप ग्रुपवर महिलांची बदनामी केल्याप्रकरणी अॅडमिनसह बदनामी करणार्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केली असून या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ‘बोला धुळेकर विचार मांडा-3’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर गेल्या दोन दिवसांपासून महिलांची बदनामी सुरु आहे. महेश बागूल हे या ग्रुपचे अॅडमिन आहेत.
कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे
या ग्रुपला राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी महापौर जयश्री अहिरराव व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मोरे या सदस्या आहेत. दि.22 एप्रिल रोजी रात्री देवा सोनार याने या दोघा महिलांची बदनामी करणारी पोस्ट या ग्रुपवर टाकली. ही पोस्ट अश्लिल असल्याने त्या विरोधात पोलिसात रितसर तक्रार करण्यात आली आहे. या ग्रुपचे अॅडमिन बागूलसह बदनामीकारक पोस्ट टाकणार्या देवा सोनार याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतांना माजी महापौर अहिरराव, मोरे यांच्यासह महापौर कल्पना महाले, मिनल पाटील, मंगला मोरे,कल्पना बोरसे, माधुरी अजळकर, चंद्रकला जाधव, माधुरी बडगुजर,शशिकला नवले,अवंताबाई माळी, कलाबाई बडगुजर, भारती अहिरराव, दिपाली अहिरराव,मनिषा वाघ, वंदना पवार, मंगला पगारे, वैशाली सगरे, लताबाई वाल्हे, आरती पवार, भारती गवळी, शोभा चौधरी,यशोदाबाई गवळी, कविता चौधरी, सुरेखा मोरे, कमलबाई चौधरी,मिना भोसले,मनिषा सगरे, मनिषा सोनवणे, रत्नप्रभा वाघ, सुमन चौधरी,प्रमिला वाघ, कल्पना पाटील, निर्मला मोरे, सत्यभामा जाधव आदी महिला उपस्थित होत्या.