शिरपूर। ‘आम्ही दोंडाईचेकर’ या व्हॉटस्अप ग्रुपवर मो. नं. 850819469 या मोबाईल क्रमांकाद्वारे पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह मॅसेज महेंद्र सुर्यवंशी उर्फे अण्णा कोळी (रा. दोंडाईचा) यांनी 24 ऑगस्ट रोजी टाकला होता. या मॅसेजसोबत खाजगी वृत्तवाहिनीचे धुळे प्रतिनिधी विशाल भिमसिंग ठाकूर यांनी महेंद्र सुर्यवंशी यांना फोन करून स्पष्टीकरण विचारले असता सुर्यंवशीने ठाकूर यांना शिवीगाळ करत पत्रकारांबद्दल अवमानकारक शब्द वापरले. यामुळे विशाल ठाकून यांनी पत्रकार संघाकडे याबाबत लेखी तक्रार दिली होती.
अधिक्षकांना निवेदन
यानुसार धुळे जिल्हा पत्रकार संघातर्फे जिल्हा पोलिस अधिक्षकांना शिवीगाळ करणारी व्हॉट्सअप पोस्ट प्रसारीत करणे तसेच पत्रकारास शिवीगाळ करणे याकारणांसाठी महेंद्र सुर्यवंशी विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष नुरखॉ पठाण, सके्रटरी सुनील पाटील, रविंद्र इंगळे, दिलीप विभांडीक आदींच्या सह्या आहेत.