व्हॉटस एप आणतेय पेटीएमसारखे एप

0

मुंबई | फेसबुक नवे नवे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचीच इंस्टंट मेसेजिंग कंपनी व्हाटसएप ही आहे. जवळ जवळ एक अरब लोक व्हाटसएपचा वापर करतात. भारतातील युझर्ससाठी कंपनी नवे फिचर आणणार आहे.

आता एक एक स्क्रीनशॉट आला आहे ज्यात युपीआय सिस्टीम (यूनिफाइड पेमेंट सिस्टम) फिचर दिसत आहे. व्हॉटसएप ब्लॉगनुसार बीटा व्हर्जनमध्ये युपीआय इंटिग्रेशन फिचर दिलेले आहे. वाबेटाइन्फो ने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यावरून कंपनी याचे लाँचिंग लवकरच करणार आहे. यामार्फत बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे हस्तांतरित करता येऊ शकणार आहेत. हे फिचर नक्की कधी सुरू होणार हे माहित नसले तरी त्याची दाट शक्यता मात्र नक्कीच आहे. पेटीएम भारतातील सर्वात मोठी इवॉलेट कंपनी आहे. ती नवी फिचर्सही देत असते. ती इंस्टंट मेसेजिंग सर्व्हिस आणणार आहे. अशात व्हॉटस अप पेमेंट सर्व्हिसचा मार्ग सोपा नाही. या शिवाय भारत सरकारची युपीआय एप आहेत त्यांच्याशी स्पर्धाही सोपी नाही.