नवी दिल्ली: भारत दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. भारतात व्हॉट्सअॅपचे कार्यालय सुरु करावे, अशी आमची प्रमुख सूचना असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
CEO of Whatsapp Chris Daniels met me today. I appreciated the role of Whatsapp in empowering people and also shared country’s concerns about misuse of #Whatsapp and requested him to take suitable steps to address those concerns. pic.twitter.com/SciU23wX7O
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) August 21, 2018
व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला तंबी दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.
ह्या भेटीमध्ये तीन विषयांवर चर्चा झाली. भारतात व्हॉट्स अॅपचे कॉर्पोरेट कार्यालय सुरु करावे, भारतात तक्रार निवारणासाठी अधिकारी नेमावेत तसेच भारतीय कायद्याचे पालन करावे या तीन मुख्य सूचना भारत सरकारने केल्या आहेत. सद्य स्थितीत व्हॉट्स अॅपशी संपर्क साधायचा असल्यास अमेरिकेत बोलावं लागतं हे आम्हाला अमान्य असून ही यंत्रणा भारतातच असायला हवी असे प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.