सोनवणे हे मावळ, आंबी येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. 27 डिसेंबर 2018 पासून आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन सोनवणे यांना व्हॉट्सअॅप आणि फेसबुकद्वारे शिवीगाळ केली जात होती. मेसेज आणि कॉल करुन वारंवार त्रास दिला जात होता.
याबाबत सोनवणे यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात 27 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. तरी देखील मेसेज येतच होते. त्याला कंटाळून त्यांनी शुक्रवारी रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.