नवी दिल्ली : आजच्या युगात व्हॉट्स अॅप हे प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. मात्र व्हॉट्स अॅप लवकरच आपल्या युजर्सचा डेटा डिलीट करणार आहे. यामध्ये तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंतचा डेटा हवा असे १२ नोव्हेंबरपूर्वी बॅकअप घ्यावा लागणार आहे. कारण व्हॉट्स अॅप आपल्या बॅकअप पद्धतीत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.
व्हॉट्स अॅपमधील डेटा आता तुमच्या डिव्हाइसवर नाही तर गुगल ड्राइव्हवर सेव्ह होईल. व्हॉट्स अॅप आणि गुगलमध्ये झालेल्या डीलनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की मेसेज बॅकअप घेण्यासाठी व्हॉट्स अॅपकडून तुम्हाला विचारणा झाली असेल किंवा ऑटोमॅटीक बॅकअपचा पर्याय समोर आला असेल. कारण, आतापर्यंत व्हॉट्स अॅप युजर्सचा डेटा फोनच्या मेमरीमध्ये सेव्ह करत होतं, त्यामुळे फोनची मेमरीही लवकर भरली जायची. पण आता हा बॅकअप गुगल ड्राइव्हवर सेव्ह होईल. व्हॉट्सअॅप यूझर्सना आपल्या अकाऊण्टमधील डेटा गुगल ड्राईव्हमध्ये साठवू देण्यास गुगलने मान्यता दिली आहे.
कसा घ्याल बॅकअप
सर्वप्रथम तुमचं गुगल अकाऊंट अॅक्टीव्हेट करा.
त्यानंतर त्यात गुगल ड्राईव्ह सेटअप इन्स्टॉल करा.
त्यानंतर व्हॉट्स अॅप सुरू करुन त्याच्या सेटिंग्समध्ये जा आणि तेथे गेलेल्या चॅट बॅकअप पर्याय शोधा
बॅकअपवर क्लिक केल्यास गुगल ड्राइव्हमध्ये ऑटोमॅटिक बॅकअप होईल