शहादा । ये थील व्हॉलंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळेच्यावतीने गणेशोत्सव प्रसंगी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. या वर्षी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत निर्माल्य दान व निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी शहादा शहर व परिसरातील सर्व गणेश भक्त व मित्र मंडळांना शाळेतर्फे आवाहन करण्यात आले आहे की सार्वजनिक गणेश मंडळ व स्वतःच्या घरी मोठ्या श्रध्देने गणेशोत्सव साजरा करीत असतो. श्री.गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी दरम्यान भक्तीने पुष्प (फुले) , पुष्पहार , पुष्पगुच्छ , दुर्वा ,फळे ,नारळ ,प्रसाद अगरबत्ती आदींचा वापर केला जातो. परंतु, गणेश विसर्जनाच्या वेळी श्री. गणेशाच्या मुर्ती सोबत वरील सर्व निर्माल्य – साहित्य नदी , तलाव , विहिर , पाण्यात विसर्जन केले जाते. यामुळे प्रचंड प्रमाणात जलप्रदूषण होत असते. या उपक्रमाने जलप्रदुषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
तलस्त्रोत स्वच्छ ठेवण्यास मदत : निर्माल्यदान – निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्पाचे उद्देश अथवा महत्त्व जल प्रदूषण होण्यापासून वाचविणे आहे. नदी ,तलाव ,विहिर आदी स्वच्छ ठेवण्यास मदत करणे.स्वच्छ भारत अभियान राबविणे पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणे निर्माल्यापासून खत निर्मिती करणेतयार झालेल्या खताचा वापर शालेय परिसरातील झाडांसाठी करणे पर्यावरण संबंधी जनजागृती करणे आपण सर्वांनी शाडू मातीच्या गणेश मूर्ती स्थापन करावी व इतरांना ही या संबंधी प्रबोधन करणे. विसर्जनाच्या दिवशी आपल्या शाडू मातीच्या मूर्ती घरातीलच कुंडीत विसर्जित करून त्यापासून तुळशी वृंदावनसाठी अथवा वृक्षारोपण करण्यातबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करणे.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धनासंबंधी जाणीव निर्माण करणे हा चांगला उद्देश आहे. या अनोख्या उपक्रमाचे शहादे शहरात प्रत्येक स्तरातून कौतुक होत आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी उचलले
प्रदूषणमुक्ती, पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी व टाकावू निर्माल्यापासून खतनिर्मितीसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे ह्या वर्षी त्या सर्व वस्तू नदी ,विहिर ,तलाव आदी ठिकाणी विसर्जित न करता त्या सर्व वस्तू – निर्माल्य – एका कुंडीत किंवा पिशवीत एकत्रितपणे जमा करून निर्माल्य दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निर्माल्यदान जमा व्हॉलंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळा शहादे येथे जमा करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.