व्हॉलीबॉल स्पर्धेत एनईएस हायस्कूलने मारली बाजी

0

भिगवण । तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एनईएस हायस्कूल व ज्युनिअर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकवला आहे. क्रीडा व युवक संचलनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच भिगवणमध्ये पार पडल्या. यात 19 वर्षीय मुलांच्या गटासाठी तालुक्यातील अनेक शाळाच्या संघांनी हजेरी लावली होती. यामध्ये निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एन.ई.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सुशीला रणवरे, स्कूल कमेटीचे अध्यक्ष डॉ. एन. जी. रणवरे, संस्थेचे सचिव रवींद्र रणवरे, विश्वस्त शामराव रणसिंग, नवनाथ बागल, चंद्रकांत बोंद्रे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्रा. वैभव हणमते, सुर्यकांत किसवे, सिंकदर मुलाणी यांनी मार्गदर्शन केले.