जळगाव: उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाबाबत रुपांतरण प्रक्रिया पुर्णत स्थगित करुन या अभ्यासक्रमास एनएसओएफ चा दर्जा द्यावा, व अनुदान घेवुन समीक्षीकरण करावे या व अन्य विविध मागण्यांसाठी व्होकेशनल टिचर्स असोसिएशनने मंगळवारी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालया समोर धरणे आंदोलन केले.
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडील शिक्षक व विद्यार्थांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रगतीला अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे याविरोधात हे आंदोलन करण्यात अाले. कार्यकारिणी सदस्य के.जी. सनेर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या मागण्यांसाठी आंदोलन —
व्यवसाय अभ्यासक्रमात विद्यार्थी संख्या प्रती तुकडी २० ठेवण्यात यावी. अभ्यासक्रमासंर्दभात नेमण्यात आलेल्या आढावा समितीचा अहवाल सार्वत्रिक करुन अंमलबजावणी करावी. घड्याळी तासिकेवरील कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ करावी पायाभुत अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांची अर्हता एम कॉम करावी. व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सैनिक भरतीसाठी पात्र ठरवावे. ५० टक्के पदे भरण्यासंर्दभात असलेल्या शासन निर्णयानुसार पद भरतीला कालमर्यादेत मंजुरी द्यावी.