नवी दिल्ली: दुरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्या व्होडाफोन, आयडिया आणि भारती एअरटेल यांना न्यायालयाकडून आज शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली आहे. समायोजित सकल महसूल (एजीआर) जमा करण्यास दुरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांकडून केल्या जात असलेल्या विलंबाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे. दुरसंचार विभागाकडे तब्बल १.४७ लाख कोटी रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने कंपन्यांना दिले आहेत.
याप्रकऱणी पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे. मात्र, तत्पुर्वी दुरसंचार विभागाकडे तब्बल १.४७ लाख कोटी रुपये जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने या कंपन्यांना दिले आहेत. समायोजित सकल महसूल प्रकरणाची आढावा याचिका या अगोदर फेटाळली असुनही अद्यापर्यंत एक पैसा देखील जमा करण्यात आलेला नाही.