जळगाव । शहरातील शंकरराव नगरातील युवकाने प्रियसीने लग्नास नकार दिल्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, युवकाने प्रियसीचा फोटो समोर ठेऊन आत्महत्या केल्याचे पोलिस सुत्रांकडून माहिती मिळाली. पोलिसांनी मोबाईल, पाकिट व मुलीचे फोटोही ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अयोध्यानगरात राहतांना मुलीशी सुत जुळले
शंकरावनगरातील अक्षय मधुकर वायकोळे (वय-22) हा धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथील तंत्रनिकेत विद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर अक्षय याने महामार्गावरील जानव्ही हॉटेलजवळ एक चायनिजची गाडी लावली होती. त्याचे वडील मधुकर वायकोळे हे इस्टेट ब्रोकर आहेत. तर लहान भाऊ पुर्वेश हा देखील डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. यातच वायकोळे कुटुंब पुर्वी आयोध्या नगरात राहत होते. त्यावेळी गल्लीतील एका मुलीशी त्याचे प्रेम होते. त्यानंतर त्यांनी घर बदलून शंकरराव नगरात घेतले होते. त्यामुळे ते काही महिन्यांपासून शंकरराव नगरात राहत होते.
मुलाला गळफास घेतलेले पाहताच आईला भोवळ
सोमवारी सकाळी मधुकर वायकोळे हे कामानिमित्ताने बाहेर गेलेले होते. तर घरी अक्षय, लहान भाऊ पुर्वेश आणि आई सुरेखा हे होते. दुपारी 12.30 वाजता जेवण झाल्यानंतर 1 वाजेच्या सुमारास अक्षय बेडरुममध्ये जातो असे सांगून गेला. त्यानंतर काही दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास भाऊ पुर्वेश त्याला बघण्यासाठी गेला. मात्र त्याने गळफास घेतल्याचे त्याला दिसले. त्याने आरडा ओरड केल्यानंतर त्याची आई त्या ठिकाणी आली. मुलाने गळफास घेतल्याचे दिसल्यानंतर आईला भोवळ आली. शेजारच्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र आपतकालीन वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषीत केले. त्यानंतर कुटुंबियांनी आक्रोश केला. रूग्णालयात योवळी अक्षयच्या मित्रांनी एकच गर्दी केली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.