नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानतर्फे अधिक मास पुरुषोत्तम पर्वकाळानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याप्रसंगी रविवारी करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती यांचे पिंपळे गुरव येथे स्वागत करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या रथातून त्यांची परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन तसेच भगव्या पताका हातामध्ये घेऊन मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रामकृष्ण मंगल कार्यालय येथे मिरवणुकीची सांगता झाली. दरम्यान या ठिकाणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, विजयअण्णा जगताप व संजय जगताप यांच्या हस्ते स्वामी विद्यानृसिंह भारतीजी महाराज यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दीपोत्सव व आशीर्वाद कार्यक्रम पार पडला. त्यांनतर स्वामी अमृत महाराज जोशी यांचे कीर्तन झाले.