Breking news …शंकर जगताप यांना शिवसेनेकडून मावळ लोकसभेची उमेदवारी ?

0

दोन ते तीन दिवसात होणार अधिकृत घोषणा; सोशल मिडीयात चर्चा सुरु

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक तसेच भाजपाचे चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप यांना शिवसेनेकडून मावळ लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची राजकीय चर्चा सध्या सोशल मिडीयातून सूरु झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचेही बोलले जात आहे. या चर्चेमुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीचे काय? याबाबत देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक शंकर जगताप हे भाजपाचे चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधु आहे. तसेच, शंकर जगताप यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2007 ते 2012 या कालावधीत पिंपळे गुरवमधून निवडून आले होते. तसेच, दोन वर्ष स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मावळ लोकसभेतून आघाडीचे पार्थ पवार विरुद्ध युतीचे शंकर जगताप यांच्यात खरी लढत होणार असल्याचे चित्र सध्या सोशल मिडीयातून व्हायरल झाले आहे.

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्याऐवजी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना मावळ लोकसभेसाठी उमेदवारी देण्याबाबत पहिली पसंती दिली आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांचे यावर एकमत झाल्याचे बोलले जात आहे. येत्या तीन चार दिवसात शंकर जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत.