शंभर दुकानांसह 200 झोपड्यांमधील वीज पुरवठा बंद

0

भुसावळ । रेल्वेच्या मालकीची अनधिकृतपणे वीज वापरणार्‍यांवर गेल्या चार दिवसांपासून रेल्वे प्रशासनातर्फे धडक कारवाई सुरूच आहे. शुक्रवारी चौथ्या दिवशी तब्बल शंभर दुकानांसह 200 झोपड्यांमधील वीजपुरवठा कट करण्यात आला. मंगळवारपासून रेल्वे प्रशासनातर्फे मोहिम हाती घेण्यात आली आहे. कोडे टाकून वीज चोरी होत आहे. अनधिकृत रहिवास करणार्‍या जागा खाली करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली.

शुक्रवारी या भागात झाली कारवाई
लिंम्पस क्लब, आरपीडी रोड, आरपीएफ बॅरेकजवळ, आरबीआय 721, आरओ प्लांट, दुर्गा देवी मंदिर परिसर, लोको रोड, बुद्ध विहार, लिंम्पस क्लब परीसरातील दुकाने, सात नंबर पोलीस चौकीजवळील दुकाने, डब्ल्यूएससी शाळेजवळ तसेच चर्चजवळ रेल्वे प्रशासनातर्फे शुक्रवारी कारवाई करण्यात आली. रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्टी धारकांना लवकरच बाहेर काढण्यात येणार असून त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाचे नियोजन सुरू आहेत तर पर्यायी जागेसाठी राज्य शासनाशी बोलणी सुरू आहे.

यांनी केली कारवाई
शुक्रवारच्या कारवाईत रेल्वेचे अनु.विभागाचे एसएसई वहिद खान, प्रसन्ना कुलकर्णी, सचिन मुरलीधर, अकोल्याचे बी.बी.दळवी, बडनेरा जे.ई.व्ही.आर.नंदेश्‍वर, खंडवा जे.ई. रमेश चंद्र मीना, भुसावळ जे.ई.पंकज कुमार, भुसावळ जे.ई.सुरेश अर्जुन सुरवाले, नांदगाव जे.ई. विशाल सतीश पाटील यांच्यासह वीज विभागातील 48 कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा विभागातर्फे निरीक्षक दीपक सोनटक्के, एस.आय.घनशाम यादव, एस.आय.शर्मा एस.आय.संजीय राय यांच्यासह आर सुरक्षा कर्मचार्‍यांनी बंदोबस्त राखला.